‘आमची काही भूमिका नाही’ हीही एका भूमिकेचीच छटा असते!
माणसाला भूमिका, बाजू, विचारसरणी असायला हवी, या मताचा मी आहे, हे आधीच नोंदवतो. माझ्या या मताच्या विरोधी कोणी असेल तर त्याचाही मी आदर करतो. मी लोकशाही, विचारस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे त्याचे मला पटत नसले तरी त्याच्या मताचे, ते व्यक्त करण्याच्या त्याच्या अधिकाराचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे; हेही मला कबूल आहे. पण असे म्हणणारी मंडळी स्वतः भूमिकारहित आहेत, असे मला वाटत नाही.......